क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
राजस्थान येथे झालेल्या अटलबिहारी वाजपेयी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत शोटोकॉन कराटे डू स्पोर्ट्स अकादमी मुचंडीच्या कराटेपटूंनी यश संपादन केले. उदयपूर, राजस्थान येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत श्रुती जोमने, संकिर्तना देमाने, प्रिया जोमने, स्वयं कित्तूर, प्रज्वल गोंधळी, मनोज देसाई, मृणाल लोहार, विनय बमरवाडी, किर्ती चौगुले, रेणुका तरळे या कराटेपटूंनी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. सर्व कराटेपटूंना कराटेमास्टर लक्ष्मण नाईक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.