कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठांतर्गत अंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत महावीर महाविद्यालयाच्या मुलींनी लालबहाद्दूर शास्त्राr महाविद्यालय, सातारा या संघाचा एकतर्फी पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले. राजारामबापू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर यांच्या संयोजनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये महावीर महाविद्यालयाच्या ऋचा आळवेकर व प्रेरणा आळवेकर या दोघी भगिनींनी आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना एकतर्फी हरवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी या दोघींची शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघामध्ये निवड झाली आहे. सदर खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रोहित पाटील, प्रा. डॉ. बाबासो उलपे यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष ऍड. के. ए. कापसे व प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांचे प्रोत्साहन लाभले.