अवकाश कार्यक्रम पूर्ण करत रचला इतिहास
हैदराबाद –
आंध्रप्रदेशमधील जान्हवी डांगेटीने नासाचा अवकाश कार्यक्रम पूर्ण करत इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. जान्हवी मूळची पश्चिम गोदावरीच्या पलाकोलू शहरातील आहे. ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. या यशाबद्दल जान्हवी म्हणते की, तिला कल्पना चावलाप्रमाणे अंतराळवीर बनायचे आहे. जान्हवीने आपल्या अभ्यासक्रमादरम्यान अमेरिकेतील अलाबामा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राममध्ये भाग घेतला होता.