कर्मचाऱयांना उपयुक्त साधने मिळत नसल्याची क्लीप केली व्हायरल
वृत्तसंस्था/ हैदराबाद
आंध्र प्रदेशमधील जगमोहन रेड्डी सरकारने एका पालिका आयुक्ताला निलंबीत केले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. नागरी म्युनिसिपल आयुक्त वेंकट रामी रेड्डी असे त्यांचे नाव आहे.
रेड्डी यांनी पीपीई किटस, सॅनिटायझर तसेच इतर वैयक्तिक स्वच्छता उपकरणे कर्मचाऱयांना मिळत नसल्याबाबत सरकारवर टिका करणारी क्लीप व्हायरल केली होती. मात्र जगमोहन सरकारने त्यांच्यावर उपाय योजना करण्याऐवजी त्यांना निलंबीत केले आहे. वेंकट रेड्डी यांनी क्लीपमध्ये स्वच्छता कर्मचाऱयांना कसल्याही सुविधा मिळत नसल्याचे म्हटले आहे. त्यांना पुरवलेले पीपीई अत्यंत निकृष्ट असून सॅनिटायझर तसेच अन्य वैयक्तिक स्वच्छतेची उपकरणे, साहित्य, औषधे मिळत नसल्याचे म्हटले आहे. अनेक उपकरणांची, औषधांची कमतरता असून कोरोनाविरोधात त्यामुळे प्रभावी उपाय योजना करणे डॉक्टर्स, एनएमस नर्सेस तसेच आशा कर्मचारी व बहुद्देशीय आरोग्य सेवकांना शक्य होत नाही. सरकार त्यांच्या जीवाशी खेळत आहे. व ते चुकीचे असल्याचे वेंकट रेड्डी यांनी म्हटले होते.
दरम्यान, सरकारने त्यांना निलंबीत केले असले तरी सरकारचे हे धोरण चुकीचे असून जगमोहन हे हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप तेलगु देसमचे नेते नारा लोकेश यांनी केला आहे. जगमोहन सरकार अशा संकटकाळी लोकांना आणि अधिकाऱयांना धीर देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोही टीडीपीने केला आहे.