अमरावती
आंध्रप्रदेशमधील कडापा जिल्हय़ात शनिवारी एका खाणीमध्ये घडलेल्या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी पाच जणांची ओळख पटली असून ते सर्व मृत कामगार मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या पुलुवेंदिला मतदारसंघातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. कडापामधील मनिल्लापल्ली गावातील खाणीत जिलेटीन स्फोट घडवले जात असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलीस अधीक्षक के. अंबुराजन यांनी दिली. या दुर्घटनेत काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.