ऑनलाईन टीम / विशाखापट्टणम :
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मध्ये शनिवारी एक मोठा अपघात झाला. येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये एक क्रेन कोसळली. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, डी सी पी सुरेश बाबू यांनी सांगितले होते की, क्रेन कोसळल्याने या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
दरम्यान, हा अपघात झाला त्यावेळी या क्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. काही अधिकारी आणि ऑपरेटर क्रेन ची पाहणी करत होते. यावेळी क्रेनवर साधारण 30 लोकं होती. यामध्ये जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत सहा मृतदेह या क्रेनखालून बाहेर काढण्यात यश आले आहे.
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले की, मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम चे जिल्हा कलेक्टर आणि शहराच्या पोलीस आयुक्तांना क्रेन दुर्घटना घटनेची दखल घेत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.