वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग बागायतदार संघ स्थापन
प्रतिनिधी/ वेंगुर्ला –
वेंगुर्लेआंबा -काजू बागायतदार संघ स्थापन करण्यासाठी सोमवारी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेच्या सभागृहात वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग व कुडाळ येथील या,आंबा -काजू उत्पादक शेतकऱयाbची बैठक जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्षपदी दिव्या वायंगणकर व सचिवपदी ऍड.प्रकाश बोवलेकर यांची निवड करण्यात आली. चार-पाच दिवसांपूर्वी वेंगुर्ले, सावंतवाडी येथील आंबा -काजू बागायतदाराbची बैठक येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात झाली होती. त्यावेळी वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग व कुडाळ येथील आंबा -काजू बागायतदाराbच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार संघाची 17 जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली.