कोरोनाच्या संकटावर थेट ग्राहक विक्रीचा उतारा
-चांगला दर मिळाल्याने बागायतदार खूष
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऐन हंगामामध्येच हापूस विक्री करताना अडचणी निर्माण झाल्या होत्य़ा या अडचणींसमोर हताश न होता या समस्येचेच संधीमध्ये रुपांतर करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ लागला आहे. विविध शासकीय, निमशासकीय संस्थांच्या समन्वयातून दलाल, अडत्यांना बाजूला सारत बागायतदार ते ग्राहक अशी थेट आंबा विक्री पध्दत रुजू लागली आहे. जिल्हा निबंधक कार्यालयाच्या सहकार्याने कृषी विभागाने 65 हजार डझन हापूसची थेट विक्री करण्यात यश मिळवले आहे.
कोकणातील हापूस विक्रीसाठी वाशी फळमार्केट ही हक्काची बाजारपेठ आह़े येथील दलाल, व्यापाऱयाबरोबर कोकणातील पिढय़ान्पिढय़ाचें व्यावासायिक संबंध आहेत़ मात्र हापूस खरेदीसाठी ग्राहक नसल्यामुळे हापूस न पाठवण्याचे आवाहन वाशी येथील व्यापाऱयांनी कोकणातील शेतकऱयांना केल़े त्यातच कोरोनाने वाशी बाजार समितीमध्ये शिरकाव केल़ा परिणामी बाजार समिती प्रशासनाने बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेतला होत़ा यामुळे हापूस विक्रीचा प्रश्न बागायतदारांसमोर होता. शेतकऱयांचे नुकसान टाळण्यासाठी टाळेबंदीतून फळ, भाजीपाला यांची विक्री व वाहतूकीवरील निर्बंध हटवण्यात आल़े मात्र ग्राहकांअभावी हापूस कसा विक्री करायचा, हा प्रश्न कायम होत़ा यावर तोडगा म्हणून हापूसची विक्री करण्यासाठी बागायतदारापासून कृषी विभाग, कृषी पणन मंडळ, ‘अपेडा’ यांनी जोरदार प्रयत्न सुरु केल़े त्यानुसार शेतकरी ते थेट ग्राहक अशी साखळी पध्दतीने हापूसची विक्री कृषी विभागाने सुरु केल़ी पणन मंडळाने ऑनलाईन हापूस विक्रीसाठी पोर्टल उपलब्ध केल़े त्यानुसार मुंबई, पुणे, ठाणे येथील ग्राहकांना घरबसल्या हापूस खरेदी केल़े यामुळे व्यापारी अथवा दलालांमार्फेत हापूसची विक्री न होता, बागायतदार ते ग्राहक विक्री पार पाडल़ी यामुळे बागायतदाराला समाधानकारक दर मिळाला व ग्राहकालाही परवडणाऱया किंमतीमध्ये हापूसची चव चाखता आल़ी
गृहनिर्माण संस्थांमध्ये मोठी विक्री
रत्नागिरी कृषी विभागाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सहकार्याने थेट गृहनिर्माण संस्थामध्ये आंबा विक्रीसाठी हालचाली सुरु केल्या होत्या. राज्यातील डीडीआर कार्यालयांनी अनेक सोसायटय़ांचे अध्यक्ष आणि सचिवांना थेट आंबा खरेदीसाठी आवाहन केल़े सोसायटीने त्यांच्या मागणीनुसार एकत्रित आंब्याची ऑर्डर शेतकऱयांना द्यायची, शेतकऱयांनी तो आंबा सोसायटीपर्यंत पोहोचवायचा आणि सोसायटीने थेट शेतकऱयांचा बँक खात्यावर पैसे जमा करायचे, अशी ही योजना होत़ी यामुळे बागायतदारांना आंब्याचे योग्य विक्री मूल्य मिळत असून यापुढे बागायतदार ते ग्राहक अशी विक्री करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बागायतदारांनी सांगितल़े
आतापर्यंत 65 हजार डझन हापूसची विक्री गृहनिर्माण संस्थामध्ये विक्री करण्यात आली आह़े यामुळे बागायतदारांना आंब्याचे योग्य विक्री मूल्य मिळत असून यापुढे बागायतदार ते ग्राहक अशी विक्री करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बागायतदारांनी सांगितल़े
कोरोनाचा प्रादुर्भाव होउढ लागल्यामुळे तो रोखण्यासाठी आधी राज्य सरकारनंतर केंद सरकारने टाळेबंदी घोषित केल़ी यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता संपूर्ण व्यवहार ठप्प झाल़े यामध्ये हापूसची विक्री करायची कोठे, हा सवाल बागायतदारांसमोर उपस्थित झाल़ा कोकणातील शेतकऱयाचे नगदी फळ म्हणून हापूस आंब्याकडे पाहिले जात़े विक्रीची व्यवस्था नाही ना वाहतुकीची ना ग्राहक यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला होत़ा अशावेळी समस्येचे संधीत रुपांतर करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ लागल्याने आशेचा किरण दिसू लागला आहे.