प्रा. अनिल मसाळे यांचे प्रतिपादन : खडकलाट, कोगनोळी, सौंदलगा, कारदगा येथे अभिवादन
वार्ताहर/ खडकलाट
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महान घटना दिली. सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला. सर्वांना शिक्षण दिले. त्याशिवाय जगात सर्वश्रे÷ असा धम्म दिला की जेणेकरून बहुजन समाजही नि÷sने वागून व देशाचे नव्हे तर जगाचे अर्थकारण करेल. तेंव्हा आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञेचे पालन करण्याचा हा दिवस असून त्यांच्या विचारांचे आचरण हेच आंबेडकरांना आदराजंली आहे, असे प्रतिपादन जागृती महाविद्यालय गडहिंग्लजचे प्रा. अनिल मसाळे यांनी केले.
रविवारी येथील भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, डॉ. आंबेडकर विद्यार्थी संघटना व समस्त बौद्ध समाज बांधवातर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख या नात्याने ते बोलत होते. तत्पूर्वी येथील डॉ. आंबेडकर चौकात येथील माजी ग्रा. पं. सदस्या शकुंतला कांबळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भंते दिपंकर व बुद्धांच्या प्रतिमेस फूले वाहून आंबेडकरांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास माजी हालशुगर संचालक आर. बी. थरकार, माजी ग्रा. पं. सदस्य सुदाम थरकार, सुकुमार थरकार, उज्ज्वल थरकार, माजी सैनिक विक्रम थरकार, विष्णू रणदिवे, काशिनाथ वराळे, अशोक हळ्ळे, तिप्पाणा थरकार, सचिन थरकार, बाळू वराळे, मिथुन वराळे, विपूल थरकार, मारुती कांबळे, खंडू वाघे, सिद्राम थरकार, संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उमेश माळगे यांच्यासह येथील सर्व युवक मंडळाचे सदस्य व बौद्ध समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कोगनोळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
कोगनोळी : येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरामध्ये घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी स्वागत, प्रास्ताविक व बुद्धवंदना नरजित विटे यांनी केले. दीपप्रज्वलन आंतरराष्ट्रीय जनसंख्याचे सेवानिवृत्त अधिकारी दिलिप मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जि. पं. माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी केले. यावेळी देवानंद आवटे, मुरलीधर मेस्त्री, भिमराव आवटे, सुनील कानडे, प्रवीण भोसले, अरुण पाटील, आण्णासाहेब कानडे, अरुण जाधव, रवी कानडे, विश्वजित विटे, नितीन कानडे, हर्षद ढोबळे, साताप्पा आवटे, अरुण माने, बाबासाहेब आवटे, सुहास घस्ते, अमर आवटे, नागेश मधळे, विनायक ढोबळे, राम विटे, संग्राम ढोबळे, आकाश मेस्त्री, सुमीत मधळे, अभिजित ढोबळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होता.
कारदगा पीकेपीएस संघात महापरिनिर्वाण दिन
कारदगा : कारदगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघातर्फे महापरिनिर्वाण दिन गांभीर्यान करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भूविकास बँकेचे संचालक एस. के. माळी यांच्या हस्ते करण्यात आले. संघाचे चेअरमन नितेश खोत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्हा. चेअरमन शहाजी नाईक, बाबासो खोत, देवाप्पा देवकत्ते, बाबासो खराडे, जयसिंग शांडगे, सोमराया गावडे, अरविंद कांबळे, उत्तम जाधव, यशवंत गावडे व सेवक वर्ग उपस्थित होता.
सौंदलगा महापरिनिर्वाण दिन
सौंदलगा : सौंदलगा येथे महात्मा फुले नगरमध्ये महापरिनिर्वाण पार पडला. मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, त्यानंतर सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली. सायंकाळी कॅन्डलमार्च काढून डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी समाजातील प्रति÷ित नागरिक पुंडलिक कांबळे व ग्रामपंचायत माजी अध्यक्ष दादू कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अजिंक्मय कांबळे, योगेश कांबळे, अनिल मेस्त्री, अजित कांबळे, प्रसन्ना मेस्त्री उपस्थित होते.