वार्ताहर /हिंडलगा
आंबेवाडी येथील शिवारात जखमी अवस्थेत सापडलेल्या मोराला जीवदान देण्यात आले. येथील शेतामध्ये विषारी पदार्थांचे सेवन केल्यामुळे सदर मोर जखमी अवस्थेत पडला होता. यावेळी शिवारातील महिलांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल भातकांडे, प्रेम तरळे, विकास भातकांडे व सतीश कोवाडकर यांना माहिती दिली. त्यांनी त्वरित दाखल होऊन लवकरात लवकर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप हन्नुरकर यांच्याकडे नेऊन उपचार केले. त्यानंतर मोराची हालचाल सुरळीत झाल्याने भाजप ग्रामीणचे माजी अध्यक्ष विनय कदम यांच्या सहकार्याने वन अधिकारी सिद्धार्थ चलवादी यांच्याकडे त्याला सुपूर्द करण्यात आले. यावेळी अधिकाऱयांनी श्रीराम युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले..