आंबेवाडी-किरावळे रस्त्यावरील नाल्यावर बांधण्यात आलेला पूल
प्रतिनिधी/ खानापूर
गुंजी गावानजीक महामार्गाला जोडणाऱया आंबेवाडी-किरावळे रस्त्यावरील नाल्यावर असलेला पूल निकामी झाला होता. हा पूल नव्याने बांधावा अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल खासदार अनंतकुमार हेगडे यांनी घेऊन पंतप्रधान सडक योजनेखाली रस्त्याच्या कामाला 40 लाखांचे अनुदान मंजूर करून घेतले होते. सदर योजनेतून आता पुलाचे काम पूर्ण झाले आहे.
आंबेवाडी-किरावळे रस्ता पूर्वी कच्चा होता. या रस्त्याच्या विकासासाठी पंतप्रधान सडक योजनेतून अनुदान मंजूर झाले होते. त्या रस्त्यावरून जाणाऱया नाल्यावर पूर्वी पूल बांधण्यात आला होता. विशेष म्हणजे किरावळेजवळील नाथपंथीयांचे किरावळे मठ तसेच किरावळे गावात असलेले नवदुर्गा मंदिर यामुळे सदर रस्त्यावरून मठावर किंवा नवदुर्गाच्या दर्शनासाठी जाणाऱया भक्तांची संख्या मोठी
असते. रस्त्याच्या डांबरीकरणामुळे भक्तांना किरावळे मठावर पेंवा नवदुर्गा मंदिराला जाणे येणे सोपे झाले होते.
पण गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये या रस्त्यावरील पूल निकामी झाला होता. यामुळे भक्तगण तसेच किरावळे ग्रामस्थांची मोठी अडचण झाली होती. या पुलाची पुनर्बांधणी व्हावी अशा मागणीचे निवेदन नवदुर्गा भक्तांनी तसेच किरावळे ग्रामस्थांनी खासदार अनंतकुमार हेगडे यांना दिले होते.
याची दखल घेऊन खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पंतप्रधान सडक योजनेतून अनुदान मंजुरीनंतर केवळ 6 महिन्यांच्या कालावधीतच पुलाची नव्याने निर्मिती केली आहे.