वार्ताहर / आंबोली
आंबोली घाटात कुंभेश्वर पासून आंबोलीच्या दिशेने 1 किलोमीटर अंतरावर रस्त्यावर भले मोठे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक पोलीस, आंबोली पोलीस आणि वनविभागाच्याड कर्मचाऱयांनी किरकोळ झाडी बाजूला करून छोटय़ा वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यास मार्ग मोकळा करून दिला. कोसळलेले झाड पूर्णपणे हटविल्यानंतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे.