सातारा / प्रतिनिधी :
किरकोळ कारणावरुन स्वतःच्या आईचा खून करुन मुलगा पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे रहिमतपूर येथे घडली.
सुलाबाई पवार (वय 65) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शहाजी पवार असे खून केलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील बसस्थानक परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुलाने धारधार शस्त्राने आईचा खून केला. त्यानंतर मुलगा स्वतः रहिमतपूर पोलीस ठाण्यात हजर झाला असून, त्याने पोलिसांना मी रागाच्या भरात माझ्या आईचा खून केला आहे, अशी कबुली दिली. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेवून तपास सुरू केला आहे.