क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
रॉ फिटनेस जिम व बेळगाव जिल्हा शरीरसौ÷व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रॉ फिटनेस जिम मर्यादीत शरीरसौ÷व स्पर्धेत आकाश रावळने रॉ फिटनेस हा मानाचा किताब पटकाविला.
धर्मवीर संभाजी उद्यान महाद्वार रोडच्या मैदानावर घेण्यात आलेल्या या शरीरसौ÷व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ले. कर्नल धैर्यशील जगदाळे, सुहास सायबण्णावर, शिवाजी माने, विक्रम पोरवाल, राहुल मुचंडीकर, एम. के. गुरव, सुरेश चौगुले, अभय चौगुले, अरविंद घाडगे, आनंद हंगिरगेकर, अमेय चौगुले, विजय चौगुले, जेडी भट्ट आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. हनुमान मूर्तीचे पूजन धैर्यशील जगदाळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शिवाजी माने यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जीम मर्यादित स्पर्धेत 22 स्पर्धकांनी भाग घेतला होता. चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे-
- 55 किलो गट -1) सुनील सज्जन, 2) सागर नाईक, 3) प्रवीण सडेकर, 4) रितेश पाटील, 5) अनंत पाटील.
- 60 किलो गट-1) आकाश रावळ, 2) सिद्धार्थ देसाई, 3) सुरज तोरे, 4) विशाल सिंग.
- 65 किलो गट-1) राहुल हणमंताचे, 2) आयुष बाचिकर, 3) सार्थक शिरोडकर, 4) सागर डी.
- 70 किलो गट-1) विनित हणमशेट, 2) अभिषेक हिरेमठ, 3) विक्रम, 4) सिद्धार्थ सदलगी.
मि. रॉ फिटनेस किताबासाठी सुनील सज्जन, आकाश रावळ, राहुल हणमंताचे, विनित हणमशेठ यांच्यात लढत झाली. त्यामध्ये आकाश रावळने रॉ फिटनेस हा मानाचा किताब पटकाविला. त्याला प्रमुख पाहुणे ले. कर्नल धैर्यशील जगदाळे, सुहास सायबण्णावर, शिवाजी माने, विक्रम पोरवाल, राहुल मुचंडीकर, सुरेश चौगुले, अभय चौगुले, अरविंद घाडगे, आनंद हंगिरगेकर, अमेय चौगुले, विजय चौगुले, एम. के. गुरव, जेडी भट्ट यांच्या हस्ते चषक, मानाचा किताब, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून एम. के. गुरव, जे. डी. भट्ट, नूर मुल्ला, वासुदेव साखळकर, सुनील अष्टेकर, बसवराज अरळीमट्ट, एम. गंगाधर, हेमंत हावळ, राजू नलवडे, अनंत लंगरकांडे, सुनील पवार तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत यांनी काम पाहिले.