वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विमान सेवा देण्यात आता नवी कंपनी आकासा एअरचाही सहभाग दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीची विमान सेवा याच वषी जूनमध्ये सुरू केली जाणार आहे.
प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची ही कंपनी असून बोईंग 737 मॅक्स विमान ताफ्यात प्राप्त झाल्यावर जूनमध्ये प्रत्यक्षात सेवेस प्रारंभ केला जाणार आहे. मार्च 2023 पर्यंत कंपनी आपल्या ताफ्यात 18 विमानांची भरती करणार असल्याचे समजते. सुरुवातीला कंपनी आपली विमान सेवा महानगरातून टायर टू व टायर थ्री शहरांना सुरू करणार आहे.
कंपनीचे सीईओ विनय दुबे यांनी कंपनी विमान सेवेसाठी सज्ज असल्याचे सांगत, एप्रिलपर्यंत विमानाचा ताबा मिळणार असून मे अखेरीस वा जूनपासून पहिली व्यावसायिक विमान सेवा प्रत्यक्षात येईल, असे सांगितले.