ऑनलाईन टीम / टोकियो
टोकीयो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारतीयांच्या आशा उंचावलेला बजरंग पुनिया याने 65 किलो फ्री स्टाइल प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. पुनियाने कझागिस्थानच्या मल्लाला सुरुवाती पासूनच आक्रमक खेळी करत नमवले आहे. कुस्ती आरंभ होताच दोन्ही खेळाडू एकमेकांची ताकद आजमावत होते. मात्र दिड मिनीटानंतर बजरंग पुनियाने आक्रमक खेळी करत अखेर पर्यंन्त कुस्तीवर वर्चस्व राखवले. हेच वर्चस्व अखेर पर्यंत राखत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.
अखेरच्या तीस सेकंदात मात्र पुनियाने प्रतिस्पर्ध्याला गुण कमावण्याची एक ही संधी न देता पुन्हा दोन गुणांची कमाई केली. आणि गुण कमावण्याची मालिका अशीच सूरु ठेवत ८-० अशा मोठ्या फरकाने ह्या संधीचे सोने करत सामना सरळ सरळ आपल्या खिशात घातला.