एसटीच्या उठा संघटनेतर्फे फोंडा पोलिस स्थानकात तक्रार : मंत्री गावडे यांच्यावरही बदनामीकारक टिपण्णी
प्रतिनिधी / फोंडा
समाजमाध्यमावर आक्षेपार्ह जातीवाचक मजकूर पोस्ट करून एसटी समाजबांधवांच्या तसेच आदिवसी नेते तथा मंत्री गोविंद गावडे यांच्यावर बदनामीकारक मजकूर लिहून भावना दुखावल्याप्रकरणी संशयित सुदीप एम. दळवी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी तक्रार एसटी समाजबांधवांच्या उठा संघटनेतर्फे फोंडा पोलीस स्थानकात दाखल केली आहे. काल रविवारी सकाळी एसटी समाजबांधव मोठय़ा संख्येन फोंडा पोलीस स्थानकातसमोर एकवटले होते.
फेसबुकवरील मंत्री गोविंद गावडे यांच्या एका व्हीडीओवर सुदीप दळवी नामक अकाऊंटवरून 4 जून रोजी आक्षेपार्ह जातीवाचक पोस्ट करून एसटी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. संशयित वास्को येथील असून सद्या तो म्हापसा येथे वास्तव्यास असल्याचे तक्रारीत नमूद पेलेले आहे. यावेळी एसटीच्या (युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स) उठा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, ऍड. पणशीकर, भालचंद उसगांवकर, सरपंच मंगेश गावडे, लक्ष्मीकांत खेडेकर उपस्थित होते. आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी सारबर सेल विभाग, पोलीस अधिक्षक व मुख्यमंत्र्याकडेही तक्रार नेंदविण्यात आली आहे. संशयिताविरोधात अनुसुचित जाती आणि जमाती कलम 1889 कलमाखाली गुन्हा नोंदविण्याची मागणी उठा संघटनेने केली आहे.
याप्रकरणी बोलताना प्रकाश वेळीप म्हणाले सदर कृत्य अपमानास्पद असून सत्तेत सामजाचे प्रतिनिधीत्व करणाऱया मंत्र्यावर अशी टिपण्dणी होत असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याकामी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. ऍड. पणशीकर म्हणाले की समाजमाध्यमावर व्यक्त होताना मर्यादा बाळगणे अंत्यत आवश्यक आहे. जातीवाचक आक्षेपार्ह मजकूर लिहून एखाद्या समाजावर जातीवाचक टिपण्dणी केल्याबद्दल कठोर कारवाई व्हावी.
दरम्यान फोंडा पोलीसांनी संशयिताविरूद्ध माहिती तंत्रज्ञानाच्या (6), भां.दं.सं. 295 कलमाखाली व अनुसुचित जाती आणि जमातीच्या अट्रोसिटी कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी संशयिताचा खोर्ली येथील निवासस्थानी शोध घेतला असता तो सापडला नाही. याप्रकरणी उप अधिक्षक नेल्सन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली फेंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.
अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी संघटनेतर्फे निषेध
फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या घटनेचा अखिल भारतीय आदिवासी कर्मचारी संघटनेच्या गोवा विभागातर्फे निषेध व्यक्त केला आहे. अनुसुचित जमातीसंबंधी जातीवाचक मजकूरासह आदिवासी नेते मंत्री गोविंद गावडे यांच्यावर बदनामीकारक मजकूर फेसबुकवर टाकल्याप्रकरणी संशयिताविरूद्ध पोलिसांनी कठोर कारवाई व्हावी असे कर्मचारी संघटनेचे समन्वयक डॉ. मधू घोडकिरेकर यांनी म्हटले आहे.