एचपी अधेसिवचा, डाटा पार्टनर्सचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
आगामी आठवडय़ात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी गुंतणूकदारांना मिळणार आहे. यामध्ये एकूण तीन कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. यामध्ये दोन कंपन्यांचे इश्यू चालू आठवडय़ात खुले होणार असून ज्यामध्ये गंतवणूक करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
एचपी अधेसिवचा इश्यू 15 रोजी खुला होणार असून 17 डिसेंबर रोजी बंद होणार आहे. कंपनीमध्ये कमीत कमी एक लॉट म्हणजे 50 समभागांसाठी गुंतवणूक करता येणार आहे. यामध्ये मूल्य 262 ते 274 रुपये निश्चित करण्यात आले असून कंपनी यातून 125.96 कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत.
डाटा पार्टनर्सचा आयपीओ 14 रोजी खुला होत 16 डिसेंबर रोजी बंद होणार आहे. याचे मूल्य हे 555 ते 585 रुपये निश्चित केले आहे. यामध्ये कमीत कमी 25 समभागांसाठी आपल्याला गुंतवणूक करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले आहे. जवळपास 588 कोटी रुपये कंपनी आयपीओतून उभारणार असल्याची माहिती आहे.
मेडप्लस हेल्थ सर्व्हिसचा आयपीओ सोमवारी खुला होणार असून तो बुधवारी बंद होणार आहे. यामध्ये कमीत कमी 18 समभागांसाठी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार असून कंपनी जवळपास 780 ते 796 रुपये मूल्य निश्चित करण्याची माहिती आहे.