पेटीएमचे लिस्टिंग 18 नोव्हेंबर रोजी
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजारासाठी येणारा आठवडा हा प्रायमरी मार्केटसाठी विशेष राहणार असून यामध्ये एकूण चार कंपन्यांचे समभाग लिस्ट होणार आहेत. सोमवारी तीन कंपन्या लिस्ट होणार असल्याचे संकेत आहेत. यातील पेटीएमचे समभागांचे लिस्टिंग 18 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे.
ग्रे मार्केटमध्ये पेटीएमचे समभाग 2,200 रुपयावर आहेत. परंतु साधारणपणे ग्रे मार्केट हे ऑफिशिअल नसते. यासाठी याचे भाव घसरतात व पुन्हा वाढत असतात. पॉलिसी बाजारचे समभाग 15 नोव्हेंबर रोजी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणार आहेत. याचवेळी एसजेएस आणि सिगाची इंडस्ट्रीजचे समभाग बाजारात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
पॉलिसी बाजाराचे समभाग
पॉलिसी बाजाराचे समभाग ग्रे बाजारात 110 ते 120 रुपयावर सुरु आहेत. अगोदर हा आकडा 20 ते 25 रुपयावर ट्रेडिंग करत होते. म्हणजे इश्यू प्राईसच्या तुलनेत हा समभाग 10 ते 15 टक्क्यांच्या वर लिस्ट होणार असल्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
तिमाही अहवालाकडे लक्ष
स्वास्तिक इन्वेस्टमार्टचे मुख्य संशोधक संतोष मीणा यांच्या माहितीनुसार आगामी आठवडय़ात बाजाराच्या दुसऱया तिमाहीतील अहवालानुसार आणि समभागांवर लिस्टिंग निश्चित होणार आहे.