ग्लोबल प्रोफेशनल फर्म अलवारेज ऍण्ड मार्सल इंडिया, सीआयआय इंस्टीटय़ूट ऑफ लॉजिस्टिक्सचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील ई-कॉमर्सचे किरकोळ मार्केट मोठय़ा प्रमाणात तेजी पकडणार असून येत्या 2024 पर्यंत या व्यवसायाची झेप ही 100 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचणार असल्याचे संकेत आहेत. 2019 मध्ये हा आकडा 30 अब्ज डॉलर राहिला आहे.
सध्या ग्राहकांकडून होत असणारी खरेदी आणि त्याच्या एकूणच खरेदी करण्याच्या मानसिकतेमधील बदल हा सर्व या गोष्टीला कारणीभूत असल्याचे ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म अलवारेज ऍण्ड मार्सल इंडिया आणि सीआयआय इंस्टीटय़ूट ऑफ लॉजिस्टिक्स यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या एक पेपरमध्ये हा दावा केला आहे.
याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन ग्रॉसरीमधील विक्रीची तेजी आणि सोबत फूड डीलीवरी कंपन्यांची वाढती संख्या याचाही प्रभाव राहणार आहे. आगामी पाच वर्षात देशात कॅटेगरी ग्रोथ ही पाच पटीने वाढण्याची शक्मयता आहे.
10 वर्षातील बदल
मागील दहा वर्षात भारतामधील रिटेल व्यवसायात मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. त्यामुळे हा उद्योग 2019 मध्ये 915 अब्ज डॉलवर होता. ई कॉमर्स रिटेल व्यवसायाचा आकार तर 2010 मध्ये 1 अब्ज डॉलरपेक्षा कमी राहिला आहे. जो वाढत जात 30 अब्ज डॉलवर स्थिरावला आहे.
मागील एक दशकात इंटरनेटचा वाढलेला विस्तार, स्मार्टफोनचा वाढलेला वेनाने वापर आणि विविध इलेक्ट्रिक साधनांची वाढती मागणी ही आगामी काळात ई कॉमर्स क्षेत्रात वेगळी क्रांती करण्याचे संकेत आहेत. अन्य देशाच्या तुलनेत भारताचा 2024 पर्यंत ई कॉमर्समध्ये 6 टक्क्मयांनी वृद्धी होत जाणार असल्याचे संकेत मांडले आहेत.