आगामी पाच वर्षांसाठी सचिवांचा अंदाज
नवी दिल्ली
देशातील वार्षिक कापड निर्यात आगामी पाच वर्षांमध्ये सध्याच्या 40 अब्ज डॉलर्सने वधारुन 100 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचणार असल्याचे संकेत कापड विभागाचे सचिव उपेंद्र प्रसाद सिंह यांनी दिले आहेत.
कापड निर्यात संवर्धन परिषद (एईपीसी)च्या 44 व्या स्थापना दिवसानिमित्त संबोधित करताना सचिव म्हणाले, देशातील उद्योगाला आपल्या पातळीवर आणि विस्तार वाढविण्यासाठी एकीकरणावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आणि उत्पादनावर आधारीत प्रोत्साहन योजनेचा लाभ उठविण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.
गुंतवणूक वाढविण्याची गरज
सदरच्या कार्यक्रमात डिजिटल माध्यमातून संबोधित करताना सचिव उपेंद्र प्रसाद सिंह यांनी कापड उद्योगाच्या विकासासाठी रोजगार वृद्धीचे ध्येय महत्त्वपूर्ण असून यामध्ये गुंतवणूक वाढीचीही गरज असल्याचे ते म्हणाले.