12 टक्क्मयांपर्यंत वाढ शक्मय : ओईसीडी व एफएओच्या अहवालातून स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही दिवसांपूर्वी स्वाईन फ्यू आणि कोरोना विषाणूच्या महामारीच्या कारणामुळे मांस उत्पादन मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले होते. आगामी एक दशकात मांस उद्योगाची वृद्धी ही तेजीत राहणार असून यामध्ये जगभरात चिकनची मागणी वेगाने वधारणार असल्याचे म्हटले आहे.
जागतिक पातळीवरील मांसचे उत्पादन 2029 पर्यंत 12 टक्क्मयांनी वाढत जाणार आहे. ब्राझिल आणि चीन यासारख्या देशांनी यात रस घेतला आहे, अशी माहिती ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को ऑपरेशन ऍण्ड डेव्हलपमेंट (ओईसीडी) आणि युएनचे फूड ऍण्ड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ) च्या अहवालामधून देण्यात आली आहे. कोविडच्या महामारीमुळे मांस उत्पादनाने नीचांकी पातळी गाठली होती. परंतु यामध्ये सुधारणा होत येत्या 2025 पर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
पर्यावरणासाठी धोकादायक
येत्या काळात मांस उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्यास त्याचा धोका पर्यावरणाला होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. कारण एका दशकामध्ये कृषी उद्योगासाठी कार्बन इमिशनचे ध्येय 6 टक्क्मयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. कार्बनचा वाढता प्रभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी जनावरांची प्रमुख भुमिका असते. त्यामुळे मांस उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढल्यास पर्यावरण आणि आरोग्यविषयक चिंता निर्माण होण्याचे संकेत सदर अहवालामधून व्यक्त केले जात आहेत.