तीन ते चार वर्षात 14,000 कोटींची गुंतवणूक होण्याचे रेटिंग एजन्सी इक्राच्या अहवालामधून संकेत
वृत्तसंस्था/ मुंबई
देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या आणि याचदरम्यान आगामी तीन ते चार वर्षांच्या कालावधीत जवळपास 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासोबतच साधारणपणे 48,000 अतिरिक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांची उभारणी करण्यात येणार असल्याचे रेटिंग एजन्सी इक्राच्या प्राप्त अहवालामधून सांगितले आहे.
आगामी काळात दुचाकी, तीनचाकी आणि बस शेणीमधील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत जाणार असल्याचे संकेत आहेत. याच दरम्यान चार्जिंग स्थानकांच्या विस्तारासाठी करार करण्यात आला असल्याचेही यावेळी सांगितले आहे.
प्राप्त अहवालानुसार आर्थिक वर्ष 2024 ते 25 पर्यंत नवीन वाहनांच्या विक्रीमध्ये दुचाकी श्रेणीत 13 ते 15 टक्के वाहने विजेवर धावणार आहेत. तसेच तीनचाकी वाहनांच्या श्रेणीत 30 टक्क्यांपेक्षा अधिकची वाहने आणि बसच्या वर्गात 8 ते 10 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश होणार आहे.
चार्जिंग स्थानकांची संख्या
सध्या देशात 2,000 पेक्षा कमी सार्वजनिक चार्जिंग स्थानक आहेत आणि यामध्ये जास्तीत जास्त निवडक शहरं आणि मुख्य शहरांच्या परिसराचा समावेश राहणार आहे.