वेंगुर्ले तालुका काँग्रेसच्या विशेष सभेत एकमताने ठराव
वार्ताहर / वेंगुर्ले:
आगामी काळातील सर्व प्रकारच्या निवडणुका स्?वबळावर लढविण्?याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी. आणि आत्तापासून कामाला लागावे, असा एकमुखी ठराव सोमवारी झालेल्या वेंगुर्ले तालुका काँग्रेस पक्षाच्या विशेष सभेत घेण्?यात आला.
येथील स्?वामिनी मंगल कार्यालयात जिल्हा कॉँग्रेसचे अध्?यक्ष बाळा गावडे यांच्या अध्?यक्षतेखाली काँग्रेसची सभा झाली. यावेळी महिला जिल्हाध्?यक्षा सा?क्षी वंजारी, तालुका अध्?यक्ष विधाता सावंत, प्रदेश प्रतिनिधी दादा परब, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, ओबीसी सेलचे जिल्हा अध्?यक्ष जगनाथ डोंगरे, पं. स. उपसभापती सिद्धेश परब, वेंगुर्ले शहर अध्?यक्ष तथा नगरसेवक गटनेते प्रकाश डिचोलकर, महिला शहर अध्?यक्षा नगरसेविका कृतिका कुबल, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग नाटेकर आदी उपस्थित होते.
सदर सभेत तालुका व शहरनिहाय असलेल्या बुथ कमिटय़ा कार्यरत करणे. प्रत्येक जि. प. विभागात बैठकांचे आयोजन करणे तसेच विविध सेलचे पदाधिकारी नेमून कमिटय़ा तयार करणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्?यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांमधून पुढील होऊ घातलेल्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काँग्रेस पक्षाने स्?वबळावर लढवाव्यात असा आग्रह धरला आहे. त्यानुसार तसा ठरावही घेण्?यात आला. यावेळी जिल्हापरिषद मतदार संघनिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले. रेडी जिल्हापरिषद मतदार संघ सिध्देश परब, उभादांडा मतदार संघ जगन्नाथ डोंगरे, तुळस मतदार संघ रावजी परब, आडेली मतदार संघ इर्शाद शेख, म्हापण मतदार संघ प्रकाश डिचोलकर अश्या प्रकारे जबाबदारीचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष विधाता सावंत यांनी येणाऱया नगरपरिषद व जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी तालुका अध्?यक्ष विधाता सावंत, प्रदेश प्रतिनिधी दादा परब, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, उपसभापती सिद्धेश परब, ओबीसी सेलचे जिल्हाध्?यक्ष जगन्नाथ डोंगरे, प्रदेश प्रतिनिधी दादा परब, वेंगुला शहर अध्?यक्ष तथा नगरसेवक गटनेते प्रकाश डिचोलकर, महिला शहर अध्?यक्षा नगरसेवक कृतिका कुबल, विजय खाडे यांनी चर्चेत भाग घेतला. या प्रसंगी तुळस/मातोंड विभागीय अध्?यक्षपदी रावजी दुलाजी परब यांची निवड करण्?यात आले. यावेळी आरवली विभागीय अध्?यक्ष मयुर आरोलकर, समीर वंजारी, विजय खाडे, नगरसेवक दादा सोकटे, उत्तम चव्हाण, रमेश नाईक, समीर नागवेकर, अंकुश मलबारी, पांडुरंग लोणे, प्रशांत परब, सखाराम परब, कृष्?णा आचरेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्?ताविक व आभार दादा सोकटे यांनी मानले.