वार्ताहर / सांबरा
कलखांब (ता. बेळगाव) येथील श्री सिद्धेश्वर गो-शाळेच्या आवारात सोमवार दि. 29 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागून गवतगंजीसह इतर साहित्य भस्मसात झाले आहे. त्यामुळे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
श्री सिद्धेश्वर गो-शाळेच्या आवारात गायींसाठी चारा साठवलेला होता. त्यामध्ये 3 टॅक्टर गवत, 2 ट्रक्टर करड व 1 ट्रक्टर कडबा होता. तसेच 100 फुट पाण्याची पाईप, 4 तट व अनेक वस्तू आगीत भस्म झाल्या आहेत. गो-शाळेच्या आवारामध्ये आंब्याची आमराई आहे. त्या आमराईतील 6 झाडेसुद्धा जळाली आहेत. आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केल्याने मोठे नुकसान झाले आहे.
आगीची घटना समजल्यानंतर तातडीने ग्रामस्थांनी धाव घेऊन आग आटोक्मयात आणली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सध्या श्री सिद्धेश्वर गो-शाळेमध्ये 45 गायी आहेत. तरी संबंधित अधिकाऱयांनी पाहणी करून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी श्री सिद्धेश्वर गो-शाळेच्यावतीने करण्यात आली आहे.