ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आग्रा येथील सिकंदरा परिसरात असलेल्या दोन केमिकल कारखान्यांना दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने उग्र रूप धारण केले असून, अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर भाजीपाला मंडईजवळ टॉपलास्ट आणि आग्रा केमिकल नावाचे दोन कारखाने आहेत. या दोन्ही कारखान्यांना आग लागली आहे. या कारखान्यात तयार होणारे केमिकल बुटांच्या सोलमध्ये वापरले जाते. कारखान्यांमधून निघणारा धूर 3 ते 4 किलोमीटर अंतरावर पसरला आहे. या परिसरात असलेल्या घरातील लोकही घराबाहेर पडले आहेत.महामार्गावर वाहनेही थांबवण्यात आली आहेत.
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल आहेत. अद्याप आगीवर नियंत्रण मिळाले नसल्याने हवाई दल आणि रिफायनरीकडून मदत मागण्यात आली आहे.