ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या काही फेऱ्यानंतर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस प्रणित महाआघाडी पिछाडीवर गेली असून, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आघाडी घेतली आहे.
एनडीएने 128 जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाआघाडी 104 जागांवर पुढे आहे. लोजप 2 तर इतर पक्ष 35 जागांवर पुढे आहेत. एनडीएमध्ये भाजप 72, जेडीयूला 48, तर महाआघाडीत राजद 65, काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर आहे.
सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी झेप घेतली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये महाआघाडीच्या आकड्यांमध्ये घसरण झाली. त्यामुळे आता अखेरच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.