वेगनारच्या कार मागणीत आघाडीवर
वृत्तसंस्था/ मुंबई
मारुती सुझुकी इंडियाने भारतात एकंदर कार विक्रीच्या स्पर्धेत कायमस्वरुपी आघाडी राखण्याचे काम केले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये आघाडीवरच्या 10 कार्सच्या विक्रीचा आलेख पाहिल्यास मारुती सुझुकीची वेगनार अव्वल ठरली आहे. वेगनार या गाडीच्या मागणीत मागच्या महिन्यामध्ये लक्षणीय वाढ दिसली आहे. नोव्हेंबरच्या कार विक्रीत मात्र कंपनीने 9 टक्के इतकी घट दर्शविली आहे. मारुतीच्या वेगनार सोबत हुंडाई, किया आणि टाटा मोटर्स यांच्या कार्स पाठोपाठ राहिल्या आहेत.
नोव्हेंबरमधील आघाडीच्या 10 कार्स
कंपनी विक्री संख्या
मारुती वेगनार .. 16,853
मारुती स्विफ्ट … 14,456
मारुती आल्टो … 13,812
मारुती विटारा ब्रिझा 10,760
हुंडाई क्रेटा……… 10,300
मारुती बलेनो……. 9,931
टाटा नेक्सॉन…….. 9831
मारुती इको………. 9571
मारुती इर्टिगा……. 8752
किया सेल्टॉस 8659