मुंबई
शेअरबाजारात मागच्या आठवडय़ात खरेदीचा माहोल दिसला. 5 व्यवहाराच्या दिवसात सेन्सेक्स निर्देशांक 753.87 अंकांनी तेजीत होता. यातील 10 पैकी 6 कंपन्यांनी बाजार भांडवलात 70 हजार कोटींची वाढ केल्याचे समोर आले आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीज आघाडीवर राहिली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 24 हजार 470 कोटींनी वाढून 13 लाख 38 हजार 763 कोटींवर पोहोचले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 14 हजार 966 कोटींनी वाढून 4 लाख 57 हजार 768 कोटी रुपयांवर पोहोचले होते तर एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 10 हजार 998 कोटींनी वाढले आहे.