प्रतिनिधी / आचरा:
आचरा वरचीवाडी येथील दशरथ मनोहर मिराशी (40) यांनी राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत घरात आढळून आला. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी वडील मनोहर मिराशी यांनी आचरा पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. आचरा वरचीवाडी येथे वयोवृद्ध आई-वडिलांसोबत राहणारे दशरथ हे मोलमजुरी करून पोट भरत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. पहाटे वडिलांना दशरथ गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. याबाबत आचरा पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चव्हाण, देसाई तपास करत आहेत. दशरथ यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, भावजय, पुतण्या, भावोजी असा परिवार आहे.