आचरा/ प्रतिनिधी-
आचरा येथील गावठी फ्रेंड्स ग्रुपतर्फे चिपळूण येथील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. सदरची संकल्पना हि गावठी फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य प्रथमेश पांगे यांनी मांडली. यावर सर्व सदस्यांनी तात्काळ आर्थिक नियोजन करून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून सदरच्या वस्तू मुंबई येथून चिपळूण येथे रवाना करण्यात आल्या. या मदतकार्यात ग्रुपचे सदस्य प्रथमेश पांगे, विवेक गुरव, प्रसाद आचरेकर,सहदेव सुर्वे, चंदू भोगले, सुरज गावकर,जयप्रकाश आचरेकर, महेश शेटये आदिंनी सहकार्य केले. आचरावासियांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.