सावंतवाडी / प्रतिनिधी:
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला आजगाव येथील बीएसएनएलचा टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर ०१ ऑक्टोबर रोजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते दुपारी २. ३० वाजता टाॅवरचे विधीवत उद्घाटन होईल असे आजगाव सरपंच सुप्रिया वाडकर यांनी स्पष्ट केले आहे. सदर टॉवर व्हावा आणि रेंजचा समस्या सुटावी यासाठी खासदार विनायक राऊत यांच्याकडे आजगांव ग्रामपंचायतचे सरपंच, सर्व सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते अंकित आजगावकर, रामा रेवाडकर, सागर नाणोसकर, एकनाथ आरोलकर, श्रीधर आरोलकर आणि समस्त आजगाव ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असल्यानेच बीएसएनएल टॉवर कार्यान्वित होत आहे. टाॅवरच्या उद्घाटन प्रसंगी आजगांव मधील काही ग्रामस्थांचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे तरी याप्रसंगी ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.