सिंधुदुर्ग युवासेना जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली संघटना – केसरकर
सावंतवाडी /प्रतिनिधी-
सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या युवासेना आयोजित शुटिंग बॉल स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी विधानसभा आमदार दिपक भाईं केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. मैदानी खेळ काळाची गरज आणि या खेळांसाठी लागेल ती मदत देण्याचा शब्द यावेळी बोलताना दीपक केसरकर यांनी दिला. या स्पर्धेत पंचक्रोशीतील १५ संघांनी सहभाग घेतला होता. आजगाव अ संघ विजेता तर आजगाव क संघ उपविजेता ठरला. यावेळी हॉटेल फिशटेल शिरोडाचे ॲड. स्वप्निल प्रभुआजगावकर, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर, प.स सदस्य मनिषा गोवेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख सोनू गवस, भाऊ पांढरे, चारूदत्त शेणई, स्वप्निल पांढरे, सच्चिद निखार्गे, सुनील वाडकर, आशिष शिरोडकर, सचिन तळकर, जयेश आडारकर, विक्रांत पांढरे, काका मेस्त्री आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..