मेष : वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवा, अंधश्रद्धेमुळे नुकसान.
वृषभ : गैरसमजामुळे वादाची ठिणगी पडेल, सावध राहा.
मिथुन : अधिकाराची जागा मिळण्याचे योग, व्यवसायात प्रगती.
कर्क : प्रापंचिक सुखात अडथळे, प्रेम प्रकरणात फसवणूक.
सिंह : पैशाची उधळपट्टी होईल, वेळीच सावध राहा.
कन्या : कपटकारस्थान व कानाचे विकार यामुळे अडचणी.
तुळ : इतरांच्या संसर्गामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता.
वृश्चिक : परिस्थितीला कलाटणी, काही नवे बदल जाणवतील.
धनु : यश, मानसन्मान व कीर्ती मिळण्याची शक्यता.
मकर : शक्यता नसलेल्या ठिकाणाहून धनलाभ, नवे संबंध जुळतील.
कुंभ : काही वैगुण्य जीवनाला नवा आर्थिक मार्ग दाखवतील.
मीन : नोकरीच्या शोधात असाल तर अपेक्षित उत्तर येईल.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी