मेष: भव्यदिव्य असे काहीतरी करून दाखवा त्यातच तुमचा उत्कर्ष.
वृषभः पूर्वी कुठे पैसे अडकलेले असतील तर ते मिळतील.
मिथुन: मुहूर्त वगैरे न पाहता योग्य वेळी योग्य काम करा यश मिळेल.
कर्क: वैवाहिक जोडीदाराला विश्वासात घेऊन व्यवसाय करा.
सिंह: खासगी, कौटुंबिक गोष्टी कुणासमोरही बोलू नका.
कन्या: काही ठिकाणी गूढ भाषेत बोलण्याचा प्रयत्न करा.
तुळ: कुटुंबातील सर्वांचे विचार पाहूनच योग्य निर्णय घ्या.
वृश्चिक: पुढे अडचणी येतील, खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनु: शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केल्यास न होणारी कामे होतील.
मकर: सतत उद्योग व उत्साही वृत्तीमुळे प्रगतीचे शिखर गाठाल.
कुंभ: अडचणीतून योग्य मार्ग मिळेल पण आळशीपणा करू नका.
मीन: कष्टाच्या मानाने प्राप्ती उत्तम राहील.