मेष: ऐश्वर्य लाभाच्या संधी, संततीप्राप्ती, भाग्योदय होईल.
वृषभः अपमानास्पद प्रसंगांना आमंत्रण देणारी वक्तव्ये टाळा.
मिथुन: पेचप्रसंग दिसल्यास परिस्थिती जपून हाताळा.
कर्क: शत्रूवर विजय मिळवाल, लोकप्रियता लाभेल.
सिंह: शिक्षण व संतती सौख्यात अडचणी उद्भवतील.
कन्या: वास्तूदोष काढायला जाऊन नवा दोष निर्माण होईल.
तुळ: नातेवाईक, भावंडांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता.
वृश्चिक: नोकरी, व्यवसाय अथवा संधी मिळाल्यास दवडू नका.
धनु: जुन्या वस्तूंना नवा उजाळा दिल्याने भाग्योदय होईल.
मकर: खर्च वाढतील, त्यातच फसवणुकीची शक्यता.
कुंभ: कष्टाळू असाल तर वैभव, श्रीमंती लाभण्याचे योग.
मीन: परगावी अथवा परदेशात गेल्यास तुमचे भाग्य उजळेल.