मेष: प्रथम स्वतःची अडचण भागवा, कर्ज अथवा उसनी रक्कम देवू नका.
वृषभः मदत करणे शक्य असेल तर शब्द द्या अन्यथा गोत्यात याल.
मिथुन: आर्थिक बाबतीत योग्य विचाराने निर्णय घ्या, पैसे अडकतील.
कर्क: कृतीने कृतज्ञता व्यक्त करा, तुमच्यावरील विश्वास वाढेल.
सिंह: पूर्वीच्या बचतीचा संचारबंदीत फायदा होईल.
कन्या: काळ कठीण आहे, खर्चाचा ताळमेळ योग्य असेल तरच वाचाल.
तुळ: एकाच वेळी दोन दिशेकडे जावू नका, गोंधळ उडेल.
वृश्चिक: क्षमाशील धोरण ठेवा, कुठेतरी त्याचा फायदा होईल.
धनु: मौन पाळल्यास शत्रुत्व आपोआप कमी होईल.
मकर: इतरांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका, अंगलट येईल.
कुंभ: मेंदूवर ताण पडल्याने वाचा दोष निर्माण होण्याची शक्यता.
मीन: कौटुंबिक त्रास कमी होईल, वैवाहिक क्लेश संपतील.