मेषः थोडा संयम व सबुरी बाळगा, सर्व इच्छा पूर्ण होतील.
वृषभःप्राप्ती कमी पण कोणतेही महत्त्वाचे काम अडणार नाही.
मिथुनः व्यावसायिक धन लाभासाठी अनुकूल दिवस.
कर्कः गोड व मुद्देसूद बोलण्यामुळे न होणारे कामदेखील होऊन जाईल
सिंहः संशोधक व चिकित्सक वृत्तीमुळे चार चौघांकडून कौतुक.
कन्याः सामाजिक क्षेत्रात असाल तर बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
तुळः नवे स्नेह संबंध जोडाल, गायन वादन यात प्रगती.
वृश्चिकः श्रीमंत कुटुंबाशी संबंध येईल, नोकरी-व्यवसायात उत्कर्ष
धनुः बुद्धिच्या आधारावर सर्वत्र यश
मकरः नको तेथे खर्च करू नका शैक्षणिक क्षेत्रात प्रगती
कुंभः प्रिय व्यक्ती भेटतील आणि थोरामोठय़ांचा सहवास लाभेल.
मीनः मनधरणी केल्यास न होणारे कामही होईल.