मेष: अनैतिक प्रेमप्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न होईल.
वृषभः कुचेष्टा, थट्टामस्करी यातून हमरीतुमरीचे प्रसंग येतील.
मिथुन: भाषा, गणित, कलाकौशल्य यात चांगले प्राविण्य मिळवाल.
कर्क: गोंधळून जाण्यासारखी परिस्थिती, मन शांत ठेवणे अवघड.
सिंह: भावंडे व कुटुंबासाठी खर्च करावा लागेल, दूरवरचे प्रवास योग.
कन्या: निष्काळजीपणामुळे अफाट खर्च कराल.
तुळ: विक्षिप्तपणामुळे पती पत्नीत गैरसमज वाढतील.
वृश्चिक: कारस्थानी व्यक्तीपासून दूर राहा फायदेशीर ठरेल.
धनु: मोठमोठय़ा लोकांच्या ओळखी होतील, महत्त्वाची कामे होतील.
मकर: हटवादीपणामुळे ताणतणाव वाढण्याची शक्यता.
कुंभ: बाजू बरोबर असूनही विरोधाला सामोरे जावे लागेल.
मीन: कुणाच्या कोणत्याही प्रकरणात भाग घेऊ नका.