मेषः पूर्ण माहितीविना ती गोष्ट वापरू नका, हस्तक्षेप केल्यास अडचणीत सापडाल.
वृषभः जड कामे टाळा, संधीवात, पाठदुखी वा खांदेदुखीचा त्रास उद्भवेल.
मिथुनः एखादे मोठे काम करण्यासाठी मोठय़ा भावंडांची मदत घ्या.
कर्कः जुन्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करून अडचणीवर मार्ग काढाल
सिंहः आळशीपणामुळे दिवसाची सुरूवात नीट होणार नाही.
कन्याः दैवयोगाने जे मिळाले त्यात समाधान माना, त्रुटीमुळे निराश व्हाल
तुळः आपण प्रतीक्षेत असलेलीच वस्तू जोडीदाराकडून भेट म्हणून मिळेल
वृश्चिकः गुप्त योजना कोणाकडेही बोलल्यास अडचणीत याल
धनुः हाती घेतलेल्या कामामध्ये बदल करून चांगला अनुभव घ्याल
मकरः एखाद्याच्या भांडणामध्ये हस्तक्षेप टाळा. टिप्पणीदेखील नको
कुंभः शेअरबाजाराशी संबंधित व्यक्तीना द्रवरूप पदार्थांपासून धनलाभ
मीनः चालू व्यवसायातच आपल्याला लाभ होईल.