मेषः विश्वास संपादन करण्यासाठी दुसऱयावर विश्वास ठेवावा लागतो
वृषभः मैत्रीत आपण गैरफायदा तर घेत नाही ना याकडे लक्ष द्या
मिथुनः जागा बदलीचे योग, स्थलांतर होईल
कर्कः संततीशी वाद न करता प्रेमाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा
सिंहः दांपत्य जीवनातील सुखामध्ये लोक अडचण निर्माण करतील
कन्याः शारीरिक व्याधी संबंधित हलगर्जीपणा त्रासदायक ठरेल
तुळः सहनशक्ती वाढवा संयमी राहा त्यातच भले असेल
वृश्चिकः अनायासे मिळालेल्या मदतीचा व इतरांचा आदर करा
धनुः राहत्या वास्तुसंबंधित प्रश्न निर्माण होतील व उत्तरही मिळेल
मकरः आपल्यावर आलेले संकट दूर होण्यासाठी शिवोपासना वाढवा.
कुंभः अचानक आलेल्या संकटामुळे मानसिक संतुलन बिघडेल,संयमी रहा
मीनः बंधू वर्गाच्या सहाय्याने आलेले संकट दूर होईल. त्यांची मदत होईल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल