बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कर्नाटकात मार्चच्या सुरूवातीपासून कोविड -१९ प्रकरणात दररोज वाढ होत असताना दिसत आहे. राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. सध्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात बाधितांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी बंगळूरमध्ये पुन्हा कोविड केअर सेंटर सुरु करणार असल्याचे म्हंटले होतो. दरम्यान कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड केअर सेंटर (सीसीसी) पुन्हा बुधवारपासून कोरोना संशयित रुग्णांना दाखल करण्याची शक्यता आहे.
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता या आठवड्यात बेंगळूर येथे तीन कोविड केअर सेंटर सुरू होतील. नागरिकांनी सहकार्य करायला हवे.कारण ही दुसरी लहर असू शकते, असे आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले.
बीबीएमपी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोविड केअर सेंट सीसीसी हज भवन (२०० बेड्स), एचएएल घाटेज कन्व्हेन्शन सेंटर (१८६ बेड) आणि नॅशनल गेम्स व्हिलेज कोरमंगळा (२०० बेड) येथे सुरु करण्यात आली आहेत.