प्रतिनिधी/ बेळगाव
दसरा व दिवाळीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून उत्सव स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर-तिरुपती या उत्सव स्पेशल रेल्वेचाही समावेश आहे. 28 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर या दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. यामुळे कोल्हापूर, मिरज, बेळगाव, हुबळी या परिसरातील बालाजी भक्तांना रेल्वेने प्रवास करून दर्शन घेता येणार आहे. उत्सव स्पेशल रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण-मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
रेल्वे क्रमांक 07415 व 07416 ही रेल्वे तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती या मार्गावर धावणार आहे. दि. 28 रोजी तिरुपती येथून ही रेल्वे निघणार आहे. कोल्हापूर येथून 30 नोव्हेंबरपासून या रेल्वेचा शुभारंभ होणार आहे. या रेल्वेमध्ये बुकिंग असणाऱया प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तिरुपती येथून निघाल्यानंतर 19 तास 35 मिनिटांनी 22 थांबे घेऊन रेल्वे कोल्हापूरला पोहोचणार आहे.
रात्री 9 वा. तिरुपती येथून निघालेली रेल्वे दुसऱया दिवशी सकाळी 11.30 वा. बेळगावला तर दुपारी 4.35 वा. कोल्हापूरला पोहोचणार आहे. कोल्हापूर येथून सकाळी 11.30 वा. निघालेली रेल्वे दुपारी 3.45 वा. बेळगावला तर दुसऱया दिवशी सकाळी 8 वा. तिरुपतीला पोहोचणार आहे.
हातकणंगले, मिरज, कुडची, रायबाग, घटप्रभा, बेळगाव, खानापूर, लोंढा अळणावर, धारवाड, हुबळी यासह इतर थांबे असणार आहेत. यापूर्वी हरिप्रिया एक्स्प्रेस या नावाने धावणारी ही रेल्वे सध्या काही दिवसांसाठी उत्सव स्पेशल रेल्वे म्हणून धावणार आहे. दिवाळीच्या काळात तिरुपती बालाजीचे दर्शन घेणाऱया भाविकांसाठी ही रेल्वे उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.