प्रतिनिधी / पणजी
गोव्यात आज मंगळवार 1 जूनपासून मासेमारी बंदी लागू झाली असून ती 31 जुलैपर्यंत म्हणजे 61 दिवस कायम राहणार आहे. गोव्यात मासेमारी करणारे सुमारे 1500 ट्रॉलर्स असून ते विविध धक्क्यांवर नांगरुन ठेवण्यात आले आहेत. तेथे काम करणारे कामगार कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, ओडिशा, महाराष्ट्र व इतर राज्यातील असून ते आता आपापल्या गावी परतू लागले आहेत. या बंदीच्या काळात गोव्यातील समुद्रात सर्व प्रकारची मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली असून इतर राज्यातील ट्रॉलर्स येऊ नयेत म्हणून गस्तीनौका पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.