प्रतिनिधी / आजरा
आजरा तालुक्यात मंगळवार दि. १९ रोजी आणखी चार कोरोना बाधित रुग्ण मिळून आहेत. यामध्ये बेलेवाडी येथील तीन तर भादवण येथील एकाच समावेश आहे.
सकाळी श्रृंगारवाडी येथील एक रूग्ण मिळाला होता. दुपारी आणखी चार रूग्ण मिळाल्याने दिवसभरात तालुक्यात पाच रुग्ण मिळाले असून तालुक्यातील रुग्ण संख्या १० झाली आहे.