7 फुटांची रुमेयसा जगातील सर्वाधिक उंचीची महिला
आजारामुळे उंची वाढली, हाडं मजबूत होऊ शकली नाहीत
तुर्कस्तानातील रुमेयसा गेलगीने जगातील सर्वाधिक उंच महिला असण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. 24 वर्षीय रुमेयसाची उंची 7.01 इंच असून तिला वीवर सिंड्रोम नावाचा आजार आहे. यामुळे शरीराची उंची असाधारण स्वरुपात वाढते, पण हाडं त्या प्रमाणात मजबूत होत नाहीत. या कारणामुळे रुमेयसा व्हिलचेअरला खिळली आहे.
प्रत्येक त्रुटीला वैशिष्टय़ात बदलले जाऊ शकते, याचमुळे जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. स्वतःच्या क्षमता जाणून घ्या आणि जे चांगले आहे ते करा असे रुमेयसा सांगते.
2014 मध्येही विक्रम
उंचीप्रकरणी रुमेयसाने 2014 मध्ये देखील गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. तेव्हा तिने जगातील सर्वात उंचीची किशोरवयीन होण्याचा विक्रम केला होता. अलिकडेच तिची उंची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या पथकाने पुन्हा मोजली आणि पुन्हा एकदा रुमेयसाने विक्रम नोंदविला आहे.
यापूर्वी सर्वाधिक उंचीची महिला असण्याचा विक्रम चीनच्या जेंग जिलिएनच्या नावावर होता. तिची उंची 8 फूट 1 इंच होती. 1982 मध्ये तिचा मृत्यू झाला होता. तर जगातील सर्वात उंच पुरुषाचा विक्रम तुर्कस्तानच्या सुल्तान कोसनेच्या नावावर आहे. त्याची उंची 8 फूट 2 इंच इतकी आहे.
वीवर सिंड्रोम म्हणजे काय?
हा एक दुर्लभ जेनेटिक डिसऑर्डर असून यामुळे बालपणीच शरीर वेगाने वाढू लागते. यामुळे याला ओव्हरग्रोथ सिंड्रोम देखील म्हटले जाते. 2011 मध्ये पहिल्यांदा या आजाराचे कारण समजले. ईझेडएच2 जीनमध्ये म्युटेशन होणे या डिसऑर्डरचे कारण असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हाडं मजबूत नसल्याने रुमेयसला वॉकिंग प्रेमची मदत घ्यावी लागते. जेव्हा कधी वेळ मिळतो, तेव्हा कुटुंबासोबत बाहेरील खाण्याचा आनंद घेते. तर शरीराला आराम देण्यासाठी पोहत असल्याचे ती सांगते.