प्रतिनिधी / वैराग
घाणेगाव तालुका बार्शी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तानाजी श्रीरंग काशीद यांनी पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 30 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की पिंपरी(सा) तालुका बार्शी येथील तानाजी श्रीरंग काशीद हे सध्या वैराग येथे राहत असून ते घाणेगाव तालुका बार्शी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते ३० ऑक्टोबर रोजी पहाटे पिंपरी शिवारात पोटाच्या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.
याबाबत वैराग पोलिस आकस्मित मयत म्हणून नोंद करण्यात आली असून काशीद यांच्या मृतदेहावर त्यांच्या मूळ गावी पिंपरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. काशीद त्यांचे पश्चात दोन मुले, पत्नी, आई, दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे.