प्रतिनिधी/ सातारा
गणेशोत्सवात जेष्ठा गौराईचे मंगळवारी आगमन होवून दुस्रया दिवशी पुजन उत्साहात झाले.कोरोनाच्या पार्श्वभूमी महिलांनी अत्यंत साध्या पद्धतीने सर्व पूजन केले. आज गुरुवार दि. 27 रोजी गौराईचे विसर्जन करण्यात येत आहे. गौराई कशाच्या पाऊली आली…सोन्या-मोत्याच्या पाऊली आली असे म्हणत आज घरा-घरात मंगळवारी गौराईचे आगमन झाले. पहिल्या दिवशी जेष्ठा गौराईला भाजी- भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. तिला दागदागिन्यांनी सजवण्यात आले. दुस्रया दिवशी म्हणजे बुधवारी पुरण पौळी, पंचपकवान बनवून तिला नैवेद्य दाखविण्यात आला दरवर्षी सुवासिन, कुमारीकांना जेवणासाठी आमंत्रण दिले जाते. यंदा अत्यंत साध्या पद्धतीने पूजन करत सोशल डिस्टन्स चे पालन करण्यात आले. संध्याकाळी पाच महिलांना बोलवून हळदी- कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. आज गुरुवारी जेष्ठा गौराईचे विसर्जन होत आहे. महिला सकाळपासून खीर-कानवल्या तयार करत आहेत. परंपरेनुसार मुखवटे हलविण्यात येत आहेत. खडे असल्यादीत विसर्जन करुन परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.तीन दिवस चाललेला हा उत्सव शाःततेत पार पडला.