दुपारी 12 पर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान झाले आहे. रविवार दि. 2 मे रोजी आरपीडी महाविद्यालय येथे मतमोजणी होणार असून आज कोण बाजी मारणार? विजयाची माळ कोणाच्या गळय़ात पडणार याचे चित्र दुपारी 12 च्या दरम्यान स्पष्ट होण्याची शक्मयता आहे.
बेळगाव लोकसभा निवडणुकीबरोबरच आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पदुच्चेरी, केरळ या राज्यांचा निकालही लागणार आहे. त्यामुळे साऱयांचेच लक्ष या मतमोजणीकडे लागून आहे. कोण विजयी होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. विविध वाहिन्यांनी एक्झिट पोलही जाहीर केले आहे. त्यामुळे साऱयांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
रविवारी होणारी मतमोजणी कोरोनाच्या कठोर नियमात पार पडणार आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे सॅनिटायझेशन करुन मतमोजणीस सुरूवात होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 यावेळेत मतमोजणी होणार आहे. यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाचे नियम पाळत ही मतमोजणी करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
कोविड सेंटरची उभारणी
गेल्या काही दिवसांपासून आरपीडी महाविद्यालयांमध्ये मतमोजणीसाठी तयारी सुरू होती. सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर यांचा वापर करावा, अशी सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे कोविड सेंटरही उभारण्यात आले आहे. एकूणच कोरोना काळात मतमोजणी करताना अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.
बैलहोंगल मतदार संघापासून मतमोजणीला होणार प्रारंभ
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदारसंघामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ येणार आहेत. रविवारी बैलहोंगल मतदार संघापासून मतमोजणीला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी 32 टेबल राहणार आहेत. एका मतदार संघासाठी दोन खोल्या. एका खोलीमध्ये केवळ दोनच टेबल ठेवण्यात येणार आहेत. निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱयांना गेल्या आठ दिवसांपासून सुचना केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळतच मतमोजणी करा, असे त्यांनी सांगितले आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये एकुण 18 लाख 13 हजार 567 मतदार आहेत. त्यामधील 10 लाख 16 हजार 24 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अरभांवी, गोकाक, बेळगा उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग या मतदार संघामधून मतदान झाले आहे. मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. 56.2 टक्के मतदान झाले आहे. असे असले तरी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
मागीलवेळी भाजप आणि काँग्रेसमध्येच ही लढत झाली होती. मात्र यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीने आपला उमेदवार उभा केल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. कमी झालेली टक्केवारी नेमकी कोणाला फायद्याची ठरणार हे आता आज स्पष्ट होणार आहे.