- 27 दिवसात 6.61 रुपयांनी महाग झाले पेट्रोल
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात आज पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये आज देखील दरवाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज पेट्रोलमध्ये 26 ते 27 पैसे आणि डिझेलमध्ये 28 ते 30 पैश्यांची वाढ झाली आहे. 4 मे पासून आतापर्यंत पेट्रोल 6.61 रुपये तर डिझेल 6.91 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे.
मुंबई, पुणे शहरात तर पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. पुण्यात आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.74 रुपये इतका होता. तर पॉवर पेट्रोल 106.42 रुपये इतके झाले आहे. तर डिझेलसाठी 93.34 रुपये मोजावे लागत आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 103.08 रुपये तर डिझेल 95.14 रुपये इतके झाले आहे.
आज दिल्लीत पेट्रोल 96.93 रुपये तर डिझेल 87.69 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 98.14 रुपये तर डिझेल 92.31 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 96.84 रुपये तर डिझेल 90.54 रुपये इतके वाढले आहे.
- परभणीत पेट्रोल 105.38 रुपये
परभणीमध्ये पेट्रोलसाठी 105.38 रुपये तर डिझेलसाठी 95.89 रुपये मोजावे लागत आहेत. तर भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोल 105.13 रुपये मिळत आहे. तर डिझेल 96.35 रुपये प्रति लिटर इतके आहे. तर राजस्थान मधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 108.07 रुपये तर डिझेलसाठी 100.82 रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत.
- दररोज 6 वाजता किंमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.